प्रवीण दरेकर उद्या सकाळी, तर देवेंद्र फडणवीस संध्याकाळी कोल्हापुरात…

0
205

कोल्हापूर (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर दोघेही उद्या (गुरुवार) कोल्हापुरात येत आहेत.

देवेंद्र फडणवीस हे उद्या सायंकाळी साडेसात वाजता पुण्याहून कोल्हापुरात येतील. कोल्हापुरात आल्यानंतर ते न्यू पॅलेसला भेट देतील. खासदार संभाजीराजे छत्रपती यांना भेटून पुन्हा पुण्याला रवाना होणार आहेत. प्रविण दरेकर गुरुवारी सकाळी सात वाजता कोल्हापुरात दाखल होतील. श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन दिवसभर विविध कार्यक्रम, बैठकांत सहभागी होतील. सायंकाळी साडेसहा वाजता सोलापूरला ते रवाना होतील. यासंबंधीचा दौऱ्याचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे.