मुंबई (प्रतिनिधी) :  खा. संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृ्त्वात उद्या (बुधवार) मराठा आरक्षणासाठी मूक मोर्चाचे आयोजन केले आहे.  महाराष्ट्रातील हा पहिलाच मराठा मोर्चा आहे. या मोर्चाला वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिसाद दिला आहे. उद्या होणाऱ्या या मोर्चात प्रकाश आंबेडकरही सहभागी होणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीने ट्विट करुन दिली आहे.

काहीच दिवसांपूर्वीच खा. संभाजीराजे छत्रपती यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर उद्या आंदोलनस्थळी येऊन मराठा आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत. दरम्यान, कोल्हापुरातील शाहू समाधी स्थळाच्या ठिकाणी हे पहिलेच आंदोलन होत असून याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.