मुंबई ( प्रतिनिधी ) केंद्र सरकारने नुकताच 2,000 हजारांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला असून, नोटाबंदी म्हणजे भाजपचे चोकिंग राजकारण सुरु असून, विरोधी पक्षाला निधी मिळू नये, त्यांच्याकडे निधीत येऊ नये यासाठी हा खेळ केला असल्याचा आरोप देखील यावेळी केला. ते अकोला येथे बोलत होते.
यावेळी बोलताना लोकसभेबाबत भाष्य केले असून, भाजपचे नियोजन काय आहे ? याबाबत ही त्यांनी भाष्य केले, ते म्हणाले की, 2000 च्या नोटा निवडणुकीमध्ये आपल्या विरोधात वापरल्या जाण्याच्या भीतीपोटा हा निर्णय घेण्यात आला आहे. या नोटांची पाच वर्षांचीच मुदत होती आणि ती मुदत संपल्याने या नोटा आम्ही रद्द केल्याचा अजब शोध भाजपने लावला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
राजकीय पक्षांनी गाफील राहू नये !
ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात लोकसभेच्या निवडणुका लागतील, यातच भाजपने हे चोकिंग राजकारण सुरु केले असल्याने राजकीय पक्षांनी गाफील राहू नये, भाजपच्या या निर्णयाचा योग्यरित्या मार्ग काढावा असं ही त्यांनी यावेळी भाजप वगळता इतर पक्षांना आवाहन केलं आहे.