आजऱ्यातील डॉक्टर असोसिएशनचा उपक्रम स्त्तुत्य : आ. प्रकाश आबिटकर

0
217

आजरा (प्रतिनिधी) : शासन आणि खासगी डॉक्टरांच्या सहभागातून आजरा येथे रोझरी कोव्हिड केअर सेंटरचा शुभारंभ खा. संजयदादा मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आला. या सेंटरमध्ये २५ ऑक्सीजन बेड करण्यात आले आहेत. डॉक्टर असोसिएशनने केलेला उपक्रम स्तुत्य असून सर्वसामान्य कोरोना रुग्णांना याचा उपयोग होणार आहे. डॉक्टरांनी कोरोनाबाधित रुग्णांची काळजी घ्यावी, असे आवाहन आ. प्रकाश आबीटकर यांनी केले.

सध्या कोरोना रुग्णांमध्ये झालेली प्रचंड वाढ,  आरोग्य यंत्रणेवर येणाऱ्या मर्यादा, ऑक्सीजन बेडसाठी ग्रामीण भागातील रुग्णांना करावी लागणारी धावपळ या सर्वांवर पर्याय हे कोव्हिड सेंटर सुरु करण्यात आले आहे. आजरा येथील इंडियन मेडीकल असोसिएशन, महसूल व आरोग्य प्रशासनाच्या संकल्पनेतून शासन आणि खासगी डॉक्टरांच्या सहभागातून हे सेंटर सुरू करण्यात आले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे आजऱ्याचे अध्यक्ष डॉ. दिपक सातोस्कर यांनी सांगितले. डॉ. गौतम नाईक यांनी, तालुज्यातील सर्वसामान्य नागरिकांची अडचण दूर होण्यासाठी हे सेंटर सुरू केले असून कमीत कमी खर्चात येथे उपचार केले जाणार असल्याचे सांगितले. तर आजऱ्यातील सेंटरला खासदार फंडातून जास्तीत जास्त मदत करणार असल्याचे आश्वासन खा. संजय मंडलिक यांनी दिले. तसेच आजऱ्यातील हा कोव्हिड सेंटरचा पॅटर्न चंदगड तालुक्यात राबविणारा असल्याचा मनोदय आ. राजेश पाटील यांनी व्यक्त केला.

यावेळी जि. प. सदस्य जयवंतराव शिंपी, सभापती उदय पवार, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र सावंत, उपविभागीय पोलीस अधिकारी इंगळे, फादर फेलिक्स लोबो, नगराध्यक्षा जोत्स्ना चराटी, उपनगराध्यक्ष विलास नाईक, नगरसेवक अभिषेक शिंपी, तहसिलदार विकास आहिर, डॉ.अनिल देशपांडे, गटविकास अधिकारी बी.डी.वाघ, मुख्याधिकारी अजिंक्य पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ यशवंत सोनवणे आदी उपस्थित होते.