प्रदूषण महामंडळाच्या आदेशानुसार यड्रावमधील पाच प्रोसेसचा वीजपुरवठा खंडित…

0
15

शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यामधील यड्राव येथे असणाऱ्या पार्वती औद्योगिक वसाहतीमधील प्रोसेसला क्लोजरची नोटीस देऊनही​ उद्योग सुरू ठेवल्याने महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार महावितरणने पाच​ प्रोसेसचा वीजपुरवठा खंडित केला. यामध्ये मनपसंद, जुबली, बाहुबली, बिर्ला,  आयको टॅक्स या पाच​ प्रोसेसचा समावेश आहे. त्यामुळे​ प्रोसेसधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.

​पंचगंगा नदी प्रदूषणात कारणीभूत ठरल्याप्रकरणी जबाबदार उद्योजकांवर गेल्या महिनाभरापूर्वी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईचा बडगा उगारला होता. यातील काही प्रोसेसधारकांना​ कारणे दाखवा नोटीस तर काही​ प्रोसेस धारकांना​ क्लोजरची नोटीस बजावली होती.​ यड्राव मधील मनपसंद,​ बाहुबली, जुबिली, बिर्ला व आयको टॅक्स या प्रोसेसना क्लोजर नोटीस देण्यात आली होती.

अखेर महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पत्रानुसार उपकार्यकारी​ अभियंता सुनील अकीवाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंता अभिजीत बिरनाळे यांच्या पथकाने पाचही प्रोसेसचा वीज पुरवठा खंडित केला त्यामुळे या​ पाच प्रोसेसवर अवलंबून असणाऱ्या ६०० कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.