कोल्हापूर (प्रतिनिधी) : पोस्ट ग्रॅज्युएटच्या  विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पद्धती ऑनलाईन करावी. अशी मागणी आज (मंगळवार) कोल्हापूर युवासेनेच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळातर्फे विद्यापीठाचे रजिस्टार व्ही.एन. शिंदे यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, शिवाजी विद्यापीठातून ग्रॅज्युएट होऊन शेकडो मुले शिक्षणासाठी बाहेर जातात. याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जॉबसाठी जातात. अशा सर्व ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे मार्कलिस्ट आणि इतर सर्व डॉक्युमेंट व्हेरिफाय करावे लागतात. ही व्हेरिफिकेशन करणारी यंत्रणा आपल्याकडे ऑफलाईन असल्याने शेकडो विद्यार्थ्यांचा वेळ आणि श्रम वाया जाते. यासाठी ही सर्व पद्धत ऑनलाईन करावी. अशा मागणीचे निवेदन युवासेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे रजिस्टार व्ही. एन. शिंदे यांच्याकडे देण्यात आले.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मंजित किरण माने, युवासेना तालूका प्रमुख जयराम पोवार, उपशहर प्रमुख सनराज शिंदे, शेखर बारटक्के, कुणाल शिंदे, वैभव जाधव आदी उपस्थित होते.