बावडा-शिये मार्गावर पाणी येण्याची शक्यता…

0
442

टोप (प्रतिनिधी) : जिल्ह्यात दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. त्यामुळे आज (गुरुवार) मध्यरात्रीच्या सुमारास शिये ते बावडा रोड बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सद्यपरिस्थितीत या रस्त्याच्या बाजूला पाणी आले आहे. या मार्गावर पाणी आल्यास यातूनच जीव धोक्यात घालून काही वाहनचालक जीव धोक्यात टाकून मार्ग काढत जाण्याचा प्रयत्न करीत असतात. यामुळे याठिकाणी बंदोबस्त लावावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.