धरणाच्या पाण्यात बुडून लोकप्रिय अभिनेत्याचा मृत्यू…

0
315

मुंबई (प्रतिनिधी) : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अनिल नेडुमंगड यांचे केरळमधील मलंकारा धरणात बुडून मृत्यू झाला आहे. ते ४८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

अनिल हे त्यांच्या आगामी ‘पीस’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी केरळमधील थोडूपुझा येथे गेले होते. यावेळी चित्रीकरण सुरु असताना चित्रपटातील कलाकार आणि क्रू मेंबर्सनी ब्रेक घेतला होता. या ब्रेकच्या काळात ते मित्रांसोबत धरणावर पोहण्यास गेले होते. मात्र, याचवेळी अनिल पोहत खोल पाण्यात गेले. आणि  पाण्याच्या प्रवाहामुळे ते बुडाल्याची माहिती अभिनेता पृथ्वीराज यांनी दिली. अनिल यांनी अय्यप्पनम कोशियुम, कम्मति पाडम, नेजन स्टीव लोपेज आणि पोरिंजू मरियम जोस सारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते.