पूजा चव्हाण प्रकरण : भाजप नगरसेवकांविरोधात तक्रार दाखल

0
402

बीड (प्रतिनिधी) : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला आहे. आता या प्रकरणाला आणखी एक नवे वळण मिळाले आहे. शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख संगिता चव्हाण यांनी भाजपच्या चित्रा वाघ आणि पुण्याचे नगरसेवक धनराज घोगरे यांच्याविरूद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

बंजारी समाजाची नाहक बदनामी आणि बंद फ्लाॅटमध्ये जाऊन पूजा चव्हाणचा लॅपटाॅप आणि मोबाईल चोरल्याचा आरोप त्यांनी धनराज घोगरे यांच्यावर केला आहे. विरोधक राजकीय पोळी भाजण्यासाठी भाजपचे नेते पूजा चव्हाण आणि बंजारा समाजाची बदनामी करत आबेत, असा आरोप त्यांनी केला आहे.

चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत युवती गर्भवती होती, तिचा गर्भपात करण्यात आला, अशा प्रकारची चरित्रहनन करणारी माहिती जाहीर केली होती. तर, बंद फ्लाॅटमध्ये घरफोडी करून काही मौल्यवान वस्तू, लॅपटाॅप आणि मोबाईल चोरून ऑडिओ क्लिप्स, व्हिडिओसोबत छेडछाड करण्यात आली. कुटुंबानी सामूहिक आत्महत्येची धमकी देऊनही तिची बदनामी सुरूच आहे, असा आरोप संगिता चव्हाण यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणात भाजपने हायकोर्टात धाव घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी करत भाजपने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्या आणखी अडचणी वाढण्याची शक्यता आहे.