मुंबई (वृत्तसंस्था) : ‘पोन्नियिन सेल्वन’ (पीएस-१) हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला असून, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन विक्रम, त्रिशा कृष्णन आणि शोभिता धुलिया मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने केवळ दक्षिणेतच नाही तर जगभरात धुमाकूळ घालता आहे. पोन्नियिन सेल्वन (पीएस-१) हा जगभरात पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा तमिळ चित्रपट आहे. हिंदी भाषेतही या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.

पोन्नियिन सेल्वन चित्रपटाने तामिळनाडूमध्ये पहिल्या दिवशी २५.८६ कोटींचा बिझनेस केला आहे. ट्रेड एनालिस्ट मनोबाला विजयनबालन यांनी ही माहिती दिली. पीएस-१ हा चित्रपट पहिल्या दिवशी २५.८६ कोटींचे उत्पन्न मिळवणारा वर्षातील तिसरा बिग ओपनर चित्रपट ठरला आहे. ट्रेड एनालिस्ट रमेश बाला यांच्या मते, पीएस-१ हा जगभरात सर्वाधिक कमाई करणारा पहिला तमिळ चित्रपट आहे. यूएसमध्ये, चित्रपटाने पहिल्या दिवशी १ मिलियन डॉलर कमावले आहेत. पीएस-१ च्या हिंदी व्हर्जन चित्रपटाचे पहिल्या दिवशी सुमारे २ कोटी रुपयांची कमाई केली. रमेश बाला यांनी ही माहिती दिली आहे.

कल्की कृष्णमूर्ती यांच्या १९९५ च्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय दुहेरी भूमिकेमध्ये दिसली आहे. तिने राणी नंदिनीसोबत राजकुमार पाजूवूर ही भूमिका देखील साकारली आहे. हा चित्रपट तामिळ, हिंदी, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.