‘पुणे पदवीधर, शिक्षक’साठी जिल्ह्यातील २८१ केंद्रांंवर उद्या मतदान

0
23

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी उद्या (मंगळवार) १ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील २८१ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. जिल्हा प्रशासनाने यासाठीची सर्व तयारी पूर्ण केली आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन तैनात करण्यात आले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप मित्रपक्षांमध्ये लढत होत असल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. 

प्रत्येक मतदान केंद्रावर सुरक्षिततेसाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सर्व मतदान केंद्रात पाणी, स्वच्छतागृहे, मदत कक्ष, आवश्यक फर्निचर यांची सुविधा करण्यात आली आहे. कोरोना अनुषंगाने सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर, थर्मल गनचा वापर करण्यात येणार आहे. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनीही शेवटच्या टप्यापर्यंत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न करीत राहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here