इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजीमधील शांतीनगर परिसरात जाधव मळा येथे २४ फेबुवारी रोजी एका तरुणाचा निघृणपणे खून करण्यात आला होता. यासाठी सहा शोध पथकांची स्थापना केली होती. या शोध पथकांना यश आले आहे. या खून प्रकरणी अक्षय रावसाहेब कमतनुरे (वय २२), तेजस उर्फ सुशांत राजू गोरे (वय १९) आणि शक्ती शहाजी इंगळे (वय २१) हे सर्व रा. शहापूर या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एमएच ०९ एफए ०३४३ हे वाहनही जप्त करण्यात आले आहे. अशी माहिती बी. बी. महामुनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी घटनास्थळा जवळील २० सीसीटीव्ही फुटेज याची पाहणी केली. अथक प्रत्यनांनी आणि खबऱ्याच्या महितीनुसार आरोपींची नावे मिळाली.   दारू आणि चैनीसाठी पडक्या जागेवर ने़ऊन पैसे काढून घेण्याच्या उद्देशाने झालेल्या झटापटीत डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची कबूली आरोपींनी प्रथिमक तपसात दिली आहे. अशी माहिती बी. बी. महामुनी यांनी दिली. या आरोपींना पकडण्यासाठी सुनील पाटील, सागर हारगुले, सुहास शिंदे, मोहसीन पठाण यांना यश आले आहे.

तसेच या पथकाला जिल्हा पोलिस प्रमुखांनी २० हजार रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. या पत्रकार परिषदेला इचलकरंजी पोलीस ठाण्याचे सपोनि गजेंद्र लोहार उपस्थित होते.