हातकणंगले (शिवाजी पाटील) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचा आणि अटींचा भंग केल्या प्रकरणी रामलिंग रस्त्यावर असलेल्या आळते येथील विजया रिसॉर्टवर काल (गुरुवार) रात्री उशीरा पोलीसांनी छापा टाकला. या रिसॉर्टमध्ये एका लग्नाच्या कार्यक्रमाचा हळदी आणि जेवणाचा कार्यक्रम रात्री उशीरापर्यंत सुरु होता.

याबाबतची अधिक माहिती अशी की, आळते तालुका हातकणंगले येथील रामलिंग तीर्थक्षेत्राच्या जवळच असलेल्या हॉटेल विजया रिसॉर्टमध्ये  हळदीचा आणि जेवणाचा कार्यक्रम रात्री उशिरा पर्यंत सुरु होता. यावेळी प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांच्या पथकाने मध्यरात्री धाड टाकली.

यामध्ये हॉटेल मालक आणि व्यवस्थापक शितलकुमार सदाशिव भरते (वय ५०) आणि देवराज गणपती तावरे (रा. जवाहरनगर, इचलकरंजी) या दोघांवर गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे. तर याबाबतची फिर्याद पो. कॉ. सुरेश पोवार यांनी दिली आहे.