पोलीस नाईक विजय घाटगे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

0
77

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहर पोलीस उपाधीक्षक कार्यालयात कार्यरत असणारे पोलीस नाईक विजय घाटगे (वय ३८, रा. राजोपाध्येनगर) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज सकाळी (सोमवार) निधन झाले. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

अधिक माहिती अशी की, नाईक आज सकाळी कार्यालयात आले असता त्यांच्या छातीत अचानक दुखू लागले. त्यांना तत्काळ कोंडाओळ येथील खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

२००८ मध्ये पोलीस दलात भरती झालेले विजय घाटगे तपास कामात अत्यंत हुशार होते. त्यांनी राजारामपुरी, शाहूपुरी पोलीस ठाण्यात सेवा बजावली आहे. मूळचे हातकणंगले तालुक्यातील रहिवासी असणारे नाईक राजोपाध्येनगर येथे राहत होते.