महिलेवर अॅसिड हल्ला करणाऱ्यास पोलीस कोठडी

0
189

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : अब्दुललाट (ता.शिरोळ) येथे आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून एका महिलेवर अँसिड फेकून जखमी करणार्‍या दादासो रामचंद्र जोशी उर्फ भोसले (वय ५४, रा. सरकारी दवाखाना जवळ, अब्दुललाट) याला येथील प्रथम वर्ग न्यायालयात उभे केले असता त्याला १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.  

पीडित महिला व संशयित आरोपी दादासो जोशी या दोघात भागीदारीमध्ये सोन्या-चांदीचा व्यवसाय आहे. या दोघांमध्ये गुरुवारी सकाळी अब्दुललाट येथील भगतसिंग चौकात पैशाच्या देवाण-घेवाणीवरून वाद झाला. रागाच्या भरात संशयित आरोपी जोशी याने सोने-चांदी पॉलिश करण्यासाठी आणलेले अँसिड पीडित महिलेच्या तोंडावर फेकून जखमी केले. पीडित जखमी महिलेवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.