मुंबई (प्रतिनधी) : पोलीस भरती प्रक्रियेसाठी शासनाच्या ज्या साईटवर उमेदवारांना अर्ज भरायचे आहेत, ती साईटच व्यवस्थित चालत नसल्याने विद्यार्थ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. बऱ्याच दिवसानंतर पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

विद्यार्थ्यांनी मोठी मेहनत घेऊन भरतीची तयारी केली असली तरी आता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी साईट चालत नसल्याने विद्यार्थ्यांना इंटरनेट कॅफेवरच रात्र जागून काढावी लागत आहे.

अनेक विद्यार्थ्यांचे अद्याप रजिस्ट्रेशन झाले नसून काही विद्यार्थ्यांची पेमेंट प्रक्रिया देखील अडकली आहे. त्यामुळे हे विद्यार्थी आता पोलीस भरतीची ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख वाढवून देण्याची मागणी सरकारकडे आहेत. पोलीस भरतीचे ऑनलाइन फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना साईट चालत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत.