टोप येथे ‘घोडागाडी’ शर्यतीवर पोलीसांची कारवाई…

0
456

टोप (प्रतिनिधी) :  पेठ वडगांव येथील सामाजिक कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त भरवण्यात आलेल्या घोडागाडी शर्यतीवर शिरोली पोलिसांनी कारवाई केली आहे. यामध्ये तीन घोडागाडीसह आठ जणांना ताब्यात घेतले. ही  कारवाई हातकणंगले तालुक्यातील टोप येथील मुळीक मळा शंभर फुटी रोड भागात करण्यात आली.

पेठवडगांव येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन राजू कांबळे (रा. दुर्गामाता मंदिर शेजारी) यांच्या वाढदिवसानिमित्त टोप येथील शंभर फुटी रोड भागात आज सकाळी घोडागाडी शर्यत भरवण्यात आली होती. याची माहिती शिरोली पोलिसांना मिळाली. यावेळी पोलिसानी कारवाई करत आठ जणांना घोडागाडीसह ताब्यात घेतले आहे. यामध्ये सचिन कांबळे, इब्राहिम बालेचँद खतीब (वय ३८ रा. हेर्ले),  हरिश्चंद्र भगवान बंडगर (वय ३३, रा. शामरावनगर, सांगली), किरण रघुनाथ लोंढे (वय  २०, रा. पोखणी, ता. वाळवा,  जि. सांगली), अनिकेत बाळासो चौगुले (रा. धामोड ता. राधानगरी), सलीम बाळासो बारगीर (वय  ३१, रा. मौजे वडगाव, ता. हातकलंगले), प्रमोद आप्पासो राजपूत (वय २७, रा.  कुपवाड ता. मिरज),  सचिन मनोहर चौगुले (वय ३८, रा.  नागाव, ता.वाळवा, जि. सांगली) अशी ताब्यात घेण्याची नावे आहेत

या आरोपींनी प्रशासनाच्या आदेशांचे पालन केले नाही, घोडागाडी शर्यती भरवून घोड्यांना निर्दयतेने वागणूक देत मारहाण केली आहे. त्यामुळे घोडागाडी शर्यत आयोजक, घोड्यांचे मालक वाहतूक करणारे वाहन, यांच्या विरोधात शिरोली पोलीसांनी कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले.