Published October 13, 2020

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा नगरपरिषदेतर्फे पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर  निधी या योजनेची अंमलबजावणी यशस्वीपणे सुरू झाली आहे. लॉकडाउनमुळे व्यवसाय बंद पडलेल्या पन्हाळ्यातील छोट्या ६३ पथविक्रेत्यांना या योजनेमुळे दिलासा मिळाला आहे.

मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पन्हाळा शहरात सुमारे १५२ पथविक्रेते आहेत. त्यापैकी आजअखेर नगरपरिषदेकडे ८३ लाभार्थींचे अर्ज प्राप्त झाले असून ७५ प्रकरणे युनियन बॅंक ऑफ इंडिया, पन्हाळा यांचेकडे शिफारस करण्यात आलेली आहेत. तसेच युनियन बॅंक ऑफ इंडियाकडून अल्पावधीत एकूण ६३ प्रकरणे मंजूर झाली असून लाभार्थ्याना भांडवली कर्जाचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नगरपरिषद कार्यालयात नगराध्यक्षा रुपाली धडेल यांच्या हस्ते बॅंक मॅनेजर पूजा रोडे आणि मनोज शिवगावकर यांना रोपटे देऊन अभिनंदन करण्यात आले.

रुपाली धडेल यांनी, शहरातील पथविक्रेते अनौपचारिक नागरी अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्वाचा घटक आहे. कोरोनामुळे पथविक्रेत्यांच्या उपजिविकेवर विपरीत परिणाम झाला होता. त्यामुळे पथविक्रेत्यांना  त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी खेळते भांडवलाचा पतपुरवठा झाल्यामुळे पथविक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे. यामुळे पन्हाळा शहरातील अर्थव्यववस्था सावरण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष रविंद्र धडेल, पन्हाळा नगरपरिषद लेखापाल  तानाजी ननावरे, अमित माने,  मुकुल चव्हाण, अंशुमन गायकवाड, आनंदा रेडेकर, जयश्री देवकुळे आदी उपस्थित होते.

 

September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023