नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्याला येणाऱ्या काळाला नवीन आशा व नाविन्याने भरायचे आहे. आपण मागील वर्षी असाधरण संयम व धैर्याचा परिचय दिला. या वर्षात देखील कठोर मेहनत घेऊन आपल्याला संकल्प पूर्ण करायचे आहेत. आपल्या देशाला अधिक गतीने पुढे न्यायचे आहे, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी  प्रजासत्ताक दिनी तिरंगा ध्वजाचा अपमान पाहून देश खूप दुःखी झाला, अशी भावना व्यक्त केली.  मोदी यांनी आज (रविवार) आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून जनतेला संबोधित केले. 

यावेळी मोदींनी दिल्लीत शेतकरी आंदोलनादरम्यान प्रजासत्ताक दिनी उफाळलेल्या हिंसाचारावर भाष्य केले. मोदी म्हणाले की, मी कृषी मंत्री नरेंद्र सिंह तौमर यांनी सांगितलेलाच मुद्दा पुन्हा एकदा सांगू इच्छितो. शेतकरी आणि सरकार यांच्यात अंतिम तोडगा भलेही निघाला नसेल, पण सरकार शेतकऱ्यांसमोर पर्याय ठेवत आहे. शेतकऱ्यांनी यावर चर्चा करावी. असे सांगितले होते. तसेच शेतकऱ्यांपासून आपण फक्त एका कॉलच्या अंतरावर आहेत, असेही मोदी म्हणाले.