राशिवडे (प्रतिनिधी) :  मागील महिन्यात मान्सूनचे आगमन जोरदार झाले. दोन ते तीन दिवसातच नद्यांची पाणीपातळी वाढली. त्यामुळे काही ठिकाणी नद्यांनी आपले पात्र सोडले होते. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी रोपलागवण करुन मोकळा झाले. पण त्यानंतर पाऊस महिनाभर गायबच झाला. त्यामुळे ही लावलेली रोपे पाण्याअभावी सुकू लागली.

वेधशाळेने पाऊस १८ तारखेनंतर सुरू होईल असं जाहीर केले होते. पण तोपर्यंत उभे असलेलं पीक वाळून जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण कालपासून वरुणराजाने दमदार आगमन केल्यानं शेतकरी सुखावला आहे. तर शेतीकामांच्या निमित्तानं शिवारे परत गजबजली आहेत. तर शेतात पाणी झाल्याने रोपलागणीला आता जोरात सुरवात झाली आहे.