वेलफेअर ऑर्गनायझेशन संस्थेमार्फत औषधी झाडांची लागवड

0
80

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन संस्थेमार्फत छत्रपती राजाराम उद्यान, टाकाळा, राजारामपुरी येथे सीड बँक तयार करण्यासाठी देशी, औषधी दुर्मिळ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच पंचगंगा नदी परिसर, बागल चौक, आर. के. नगर, दौलत नगर, रुईकर कॉलनी मैदान येथील सुमारे १८० झाडांच्या देखभालीसाठी उपाययोजना केल्या.

यामध्ये झाडांना काठया, शेडनेट बांधणे, तण काढणे, आळी करणे, औषध फवारणी अशा प्रकारे मेंटेनन्स ची कामे करण्यात आली. यावेळी स्थानिक नागरिकांच्या सहभागतून देशी झाडांचे ब्रम्हा दंड टेंभुर्णी, करमाळा, कुंकू फळ, कडुलिंब, पायर, औदुंबर, कदंब, जांभूळ, हेळा, बिटी, पिंपळ, मोर आवळा, करंज, बेल अशा दुर्मीळ औषधी वनस्पतीचे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी अमृत चित्रगार वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्ढ़े, सतीश कोरडे, परितोष उरकुडे, उदयसिंह जाधव, राजेंद्र शिंदे, शैलेश टिकार, प्रवीण मगदूम आदींनी सहभाग घेतला.