कोल्हापूर (प्रतिनिधी) : वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन संस्थेमार्फत हरिओम नगर, सानेगुरुजी वसाहत येथे ऑक्सीजन पार्क आणि सीड बँक तयार करण्याच्या दृष्टिकोनातून दुर्मिळ होत चाललेल्या आणि औषधी अशा १०० वनस्पतीची लागवड करण्यात आली.

यामध्ये प्रामुख्याने मुचकुंद, नागकेशर ब्रहादंड, बिक्सा, गुळभेंडी धावडा, शेंद्री पांढारी सावर, कदंब, कांचन अशा वृक्षाचा समावेश होता. यावेळी गटनेते शारंगधर देशमुख, अमृत चित्रगार, वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्डे, सतीश कोरडे, अक्षय कांबळे, परितोष उरकुडे, रोहन बेवीनकट्टी, साजिद शेख, ओंकार कांबळे, सचिन पोवार आदींनी सहभाग घेतला.

पॅव्हिलीयन ग्रांऊड व वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन संस्थेमार्फत राजाराम बंधारावरील बाजूचे सिमेंटच्या छोटया खांबाचे रंग रंगोटी (पांढरा कलर) करण्यात आली. त्याचप्रमाणे कसबा बावडा ग्रांऊड वरील पदपथावरील स्वच्छता करुन तेथे ही अतिशय सुंदर अशी रंगरंगोटी करण्यात आली.