कोल्हापुरातील कबरस्थानात बागवान समाजातर्फे वृक्षारोपण  

0
14

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील बागल चौकातील कबरस्तानमध्ये आज (सोमवार) बागवान समाजाच्या वतीने वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. याअंतर्गत विविध प्रकारचे कमी मूळ येणारे वृक्ष लागवड करण्यात आली. यासाठी आजरेकर फाउंडेशन यांच्याकडून रोपे देण्यात आले. या वेळी संपूर्ण जगावर कोरोना महामारीचे संकट आले आहे हे लवकरात लवकर संपावे, अशी सामूहिक दुवा करण्यात आली.

या वेळी मुस्लीम बोर्डिंगचे प्रशासक कादरभाई मलबारी, बागवान समाजाचे अध्यक्ष आर. डी. बागवान, कबरस्तान विकास समितीचे फारुक पटवेकर, मुजीब महात, अबिद मणेर, बागवान समाजाचे उपाध्यक्ष रियाज बागवान, कार्याध्यक्ष बक्ष बागवान, खजानीस हाजी कयूम बागवान उपस्थित होते.