स्वरा फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण  

0
65

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महास्वछता अभियानांतर्गत स्वरा फाउंडेशनच्या वतीने जयंती पम्पिंग स्टेशन येथे स्वच्छता मोहीम राबवून वृक्षारोपण करण्यात आले. त्याचबरोबर झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी कोल्हापूर महापालिकेच्या  ड्रेनेज व पाणीपुरवठा विभागाचे अभियंता आर.के. पाटील, स्वरा फाउंडेशनच्या संचालक प्राजक्ता माजगावकर, महिला जिल्हाध्यक्ष सविता पाडळकर, उपाध्यक्ष आदित्य पाटील, पियुष हुलस्वार, फैजान देसाई, मुकुंद कांबळे, सुफियान शेख, मानसी कांबळे, काका पडळकर, सुनिता मेघाने  आदीसह सदस्य,  महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.