कसबा बावडा (प्रतिनिधी) : येथील डी. वाय. पाटील स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना यंदा इंडियन नेव्ही, टीसीएस, इन्फोसिस,  कॅपजेमिनी, विप्रो अशा ख्यातनाम कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे. महाविद्यालयातील तब्बल ३०३ विद्यार्थ्याना कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली आहे. यातील काही विद्यार्थ्यांना वार्षिक ६ लाख ते १८ लाख वेतन मिळणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा. सुदर्शन सुतार यांनी दिली.

महाविद्यालयाला मिळालेला स्वायत्त दर्जा, ‘अ’ दर्जाचे नॅक नामांकन आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि इतर बाबी विचारात घेऊन बहुराष्ट्रीय कंपन्यांनी थेट कॅम्पसमध्ये येऊन अंतिम वर्षाच्या मुलांच्या लेखी परीक्षा, समूह चर्चा आणि मुलाखती घेऊन ही निवड केली. कोरोना काळातही ऑनलाईन कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे प्लेसमेंट ड्राईव्ह घेण्यात आले.

‘फोर्ब्ज ५००’ लिस्ट मधील अनेक कंपन्यांसह एकूण १०३ कंपन्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी झाल्या होत्या. कॅपजेमिनी, टीसीएस, विप्रो, बिटवाईज, केपीआयटी, पर्सिस्टंट, वोडाफोन, एस.एल.के., ओएस  ग्रुप -जपान, माईंड ट्री, अटॉस -सिंटेल, फिनोलेक्स, लक्ष्मी ऑर्गॅनिक्स, फिलिप्स इंडिया, आनंद ग्रुप, लुपिन फार्मा, बायजु, व्हाईट ज्युनिअर एचआर, मौरी इन्फोटेक, टी -कॉग्निशन,  घाटगे-पाटील इंडस्ट्री, धूत ट्रान्समिशन, जारो एज्युकेशन, नेटवर्क लॅब्स, व्हरतुसा,  ऑटोमॅटॉ सिस्टीम, हिंद रेक्टिफायर, मायक्रोचीप अशा नामांकित कंपन्यांमध्ये डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

अधिष्ठाता डॉ. क्षमा कुलहळ्ळी यांनी यावेळी निवडक नामांकित कंपनांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्याबाबत महिती दिली. प्रथमेश पाटील (इंडियन नेव्ही & इंडियन एअर फोर्स), अमित माळी (मुथा), सलमान देसाई (इन्फोसिस), अश्विन पवार (कॉग्निजंट),  गणेश यादव  (एस.एल.के),  अनिकेत पाटील (ऍक्वा फार्म),  ऋतुराज देसाई (इ-इम्फासिस, जारो व  ब्येजूस),  प्रतीक्षा पाटील (अटॉस -सिंटेल), प्रशांत हरगुडे (पर्सिस्टंट),  करण कुलकर्णी (टीसीएस),  संदीप मेनन (टीसीएस), मुदस्सर मुल्ला (कॅपजेमिनी),  ऋतुराज सावंत (विप्रो), शिवानी दिंडे (ग्रे ऍटम),  ममता रोपालकर (इन्फोसिस), सिद्धेश पाटील (घाटगे-पाटील इंडस्ट्री), आदित्य ढाकोरे (लुपिन फार्मा), सदानंद शेडोळकर (घाटगे-पाटील इंडस्ट्री), रितेश बागलाने (स्मृती ऑर्गेनिकस), प्रशांत कुमार (कॅपजेमिनी व युबीसॉफ्ट), ओंकार पाटील (पिनक्लिक)

या निवडीकरता संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील,  कार्यकारी संचालक अनिलकुमार गुप्ता,  प्रा. संतोष चेडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. या निवडीसाठी सर्व विभागप्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी विशेष परिश्रम घेतले.