Published June 2, 2023

छत्रपती संभाजीनगर :  महिला वर्गउद्या शनिवारी (3 जून) वटपौर्णिमेनिमित्त आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करताना दिसतील, मात्र त्याआधीच पत्नीपीडित पुरुषांनी छत्रपती संभाजीनगर येथील वाळूजमध्ये पिंपळ पौर्णिमा साजरी करत निषेध व्यक्त केला आहे.

वट पौर्णिमेनिमित दरवर्षी बायका हाच पती सात जन्म मिळावा यासाठी वडाला फेऱ्या मारताना साकडे  घालताना दिसतात. पण वट पौर्णिमेच्या एक दिवस आधी छत्रपती संभाजीनगर येथील पत्नीपीडित आश्रमचे सभासद पिंपळ पौर्णिमा साजरी करून पुरुषांच्या समस्यांकडेही लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतात. पीडित पुरुषांनी भांडखोर बायका सात जन्मच काय सात सेकंदही नको, असे म्हणत पिंपळ पौर्णिमा साजरी केली.

पीडित पुरुषांचे म्हणणे आहे की, दिवसेंदिवस पुरुषांवरील अन्यायात वाढ होत आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी वेगवेगळे कायदे बनवले गेले, परंतु हे कायदे बनवताना पुरुषांवर अन्याय होऊन ते पीडित होतील, याचा विचार करण्यात आला नाही. त्यामुळे सध्याच्या काळात पुरुष हतबल होऊन पीडित झाले आहेत. त्यामुळे पुरुष सबलीकरण करण्यासाठी तयार करण्यात आलेले एकतर्फी कायदे रद्द होऊन पुरुषांना देखील कायद्याचे संरक्षण मिळणे गरजेचे असल्याचे पीडित पुरुषांचे म्हणणे आहे.

पुरुष मोठ्या आशा उराशी बाळगून मोठ्या उत्साहाने लग्न करतो, पण लग्न झाल्यावर त्याच्या स्वप्नाचे तुकडे तुकडे होणार हे त्याला माहित नसते. बहुतेक वेळेला लग्न झाल्यावर पतीशी कारण नसताना भांडण करण्याचा प्रयत्न करतात. याशिवाय काही बायका पतीचा बुजगावण्यासारखा वापर करतात. लग्नाचा शिक्का मारल्यावर त्यांना नवऱ्याची संपत्ती हवी असते, मात्र त्यांना पती आणि त्याचे नाव नको असते. जर तिला संपत्ती मिळत नसेल, तर ती पतीसोबत आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबावर केस करून त्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करते, असे पीडित पुरुषांचे मत आहे.

September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023