छगन भुजबळ यांच्याविरोधात शिवसेना आमदाराची न्यायालयात याचिका

0
11

नाशिक (प्रतिनिधी) : पालकमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री व नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ ठेकेदारांना निधी विकत असल्याचा आरोप करून नांदगावचे शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी निधी वाटपावरून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेत  नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून नाशिकमध्ये वादाला सुरूवात झाली आहे. जिल्हाधिकारी सुरज मांढरे आणि जिल्हा नियोजन समितीच्या अधिकाऱ्यांनादेखील यात प्रतिवादी केले आहे.

मंत्री भुजबळ यांच्याकडून जिल्हा नियोजन समितीच्या अध्यक्षपदाचा गैरवापर करत आहेत. आपल्या मर्जीतील आणि समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना ते कामे देत आहेत, असा आरोपही कांदे यांनी केला आहे. नांदगावच्या आढावा बैठकीत भुजबळ आणि कांदे यांच्यात खडाजंगी झाली होती. नांदगाव मतदारसंघात आमदार कांदे यांनी भुजबळ पुत्र माजी आमदार पंकज भुजबळ यांचा पराभव केला आहे. त्यामुळेच निधी देताना पक्षपातीपणा केला जात असल्याची भावना आ. कांदे यांच्या कार्यकर्त्यांतून व्यक्त केली जात आहे.