पेठवडगाव (प्रतिनिधी) : कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे यंदाचा नवरात्रोत्सव, दुर्गापूजा, दसरा पेठवडगाववासियांनी साध्या पध्दतीने साजरा करावा, असे आवाहन करून या उत्सव काळात प्रतिबंधित क्षेत्राच्या ठिकाणी रस्त्यावर कोणताही व्यवसाय करता येणार नाही, अशी सूचना नगरपालिकेने केली आहे.

शहरात सुरक्षित वावराच्या नियमांचे पालन करुन दुर्गामाता मूर्ती घेणेकरिता गर्दी होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेणेत यावी. पारंपरिक मूर्तीऐवजी धातूच्या अथवा मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणेत यावी. देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळाकरिता ४ फूट व घरगुती २ फूट उंचीची असावी. देवीचे आगमन व विसर्जन रँली काढणेस बंदी आहे. गरबा, दांडिया व सांस्कृतिक कार्यक्रमास बंदी राहील. त्या ऐवजी आरोग्यविषयक शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य दयावे, असे आवाहन वडगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मोहनलाल माळी, उपनगराध्यक्ष शरद पाटील, मुख्याधिकारी सुषमा शिंदे यांनी केले आहे.