कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कोणतेही पेट शॉप व डॉग ब्रिडींग सेंटर प्राणी कल्याण मंडळाची नोंदणी केल्याशिवाय सुरू न करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांनी केले आहे.

पठाण यांनी पत्रकात म्हटले आहे की, प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० अंतर्गत पाळीव प्राणी दुकान नियम २०१८ आणि श्वान प्रजनन व विपणन नियम २०१७ या नियमातील तरतुदीनुसार राज्यातील पाळीव प्राण्यांची दुकाने तसेच श्वान प्रजनन व विपणन केंद्राची महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळ, पुणे यांच्याकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे.

ग्रामपंचायत / नगरपालिका / महानगरपालिका येथील कर्मचाऱ्यांची निरीक्षक म्हणून नेमणूक करून कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या पेट शॉप व डॉग ब्रिडींग सेंटर यांना ३० दिवसांच्या आत नोंदणी करून घेण्यासाठी नोटीस देण्याबाबत आदेशित करावे व जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयास अवगत करावे.