स्पर्धा, खेळ आयोजनासाठी अटींवर परवानगी : जिल्हाधिकारी

0
80

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रतिबंधात्मक क्षेत्राबाहेरील राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडूसाठी असलेल्या प्रशिक्षण संस्था व खेळाशी संबंधीत संघटनेतर्फे आयोजित स्पर्धा, खेळासाठी आणि राज्य सरकारच्या प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास काही अटींवर परवानगी देण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहे.

जिल्हाधिकारी म्हणाले की, राज्यांतर्गत विविध खेळासाठी कार्यरत असणाऱ्या प्रशिक्षण संस्था यांचा देखील यामध्ये समावेश असेल. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना या क्रीडा आणि युवक कल्याण विभाग यांचेमार्फत निर्गमित करण्यात येतील.  मार्गदर्शक सुचना निर्गमित करताना भारत सरकारच्या क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाने निर्गमित केलेल्या सूचना विचारात घेणेत याव्यात, असे ते म्हणाले.