‘या’ रुग्णालयाला उघडयावर जैव वैद्यकीय कचरा टाकल्याबददल केला दंड…

0
49

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बी वॉर्ड, बेलबाग, पदमावती मंदीर जवळ, मंगळवार पेठ या ठिकाणी शरया हार्ट केअर नर्सिंग होम आहे. या हॉस्पिटलला  उघड्यावरती जैव वैद्यकीय कचरा टाकल्याबददल महापालिकेच्या विभागीय आरोग्य निरीक्षक राहूल राजगोळकर यांच्या पथकाने त्यांना पाच हजार रुपयांच्या दंडाची कारवाई  केली आहे.

शहरातील वैद्यकीय, व्यापारी व व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाच्या अनुषंगाने कसलाही कचरा रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी उघडयावर टाकू नये, असे आवाहन महापौर सौ.निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here