खिंडी व्हरवडे येथे शांततेत मतदान…

0
240

राधानगरी (प्रतिनिधी) :  राधानगरी तालुक्यातील खिंडी व्हरवडे येथे मतदान शांततेत पण चुरशीने पार पडले. प्रभाग क्रमांक १ मध्ये ८७.८९ टक्के, प्रभाग क्रमांक २ मध्ये ८५.९८ टक्के, प्रभाग क्रमांक ३ मध्ये ९१.०६ टक्के मतदान झाले. येथील निवडणूक संपूर्ण तालुक्यात चर्चेची ठरली आहे. गावातील सर्व नेते एकीकडे आणि शिवसेना आपले मोजके मावळे घेऊन ही निवडणूक लढवत आहे.

दत्त महाविकास आघाडीकडे गावातील राजाराम पाटील, शिवाजी पारखे, बी. जी. खांडेकर, डॉ. खांडेकर, रामभाऊ पाटील हे सर्व नेते आहेत. तर हनुमान ग्राम विकास आघाडीचे नेतृत्व श्रीकांत पाटील, संजयसिंह सावंत, संभाजी जाधव, सचिन पाटील या मोजक्याच सर्वसामान्य लोकांनी केले.  एकीकडे नेते आणि दुसरीकडे सामान्य तरूण अशी लढत शांततेत पण चुरशीने पार पडली.