कागल (प्रतिनिधी) : छ. राजर्षी शाहू महाराजांचे बंधू, कागल संस्थानचे पाचवे राजे, श्रीमंत सरपिराजीराव घाटगे तथा बापूसाहेब महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. बापूसाहेब महाराज चौकातील त्यांच्या पुतळ्यास शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

समरजितसिंह घाटगे म्हणाले की, कागल जहागिरीची कमान यशस्वीपणे सांभाळणाऱ्या बापूसाहेब महाराजांचा राजर्षि शाहू महाराजांच्या यशस्वी कारकीर्दीमध्ये त्यांचा छोटे बंधू म्हणून मोठा वाटा आहे. राधानगरी धरण, शाहूपुरी व्यापार पेठ, जयसिंगपूर शहर व मुरगूडचा तलाव उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. कुस्ती कलेला त्यांनी उत्तेजन दिले होते. बहुजनांच्या हितासाठी त्यांनी केलेले कार्य आजही चिरंतन आहे. त्यांचाच आदर्श समोर ठेवून त्यांच्या समाजसेवेचा वारसा मी चालवीत आहे. याचा मला अभिमान आहे.

या वेळी बाबगोंडा पाटील, ‘शाहू’चे संचालक यशवंत माने, प्रमोद कदम, युवराज पसारे,  आप्पासाहेब भोसले, आप्पासाहेब हुच्चे, रमेश घाटगे, धीरज घाटगे, आसिफ मुल्ला, रमेश मुजावर, बाळासाहेब हेगडे आदी उपस्थित होते.