इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी नगरपरिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देय रक्कम चर्चेचा विषय बनला होता. नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सेवानिवृत्त आणि मयत कर्मचाऱ्यांच्या उपदान (ग्रॅज्युएटी), हक्काच्या रजेचा पगार, राखीव वेतन निधीतून ७ कोटी ४ लाख ९० हजारांची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली.

या देयकांचा वाटप प्रदान सोहळा आज (शुक्रवार) नगरपरिषदेच्या सभागृहात संपन्न झाला. यासाठी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार आणि माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी मागील एक महिन्यापासून केलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे. यासाठी खा. धैर्यशील माने आणि माजी आ. सुरेशराव हाळवणकर यांचे सहकार्य लाभले.

यावेळी नगराध्यक्ष अलका स्वामी, बांधकाम सभापती उदयसिंग पाटील, आरोग्यसभापती संजय केंगार, पाणी पुरवठा सभापती दीपक सुर्वे, महिला व बालकल्याण सभापती सारिका पाटील, नगरसेवक राहुल खंजिरे, रवींद्र माने, प्रकाश मोरबाळे, सेवानिवृत्त कर्मचारी आदी उपस्थित होते.