पवारसाहेब उद्या जेजुरीला येताहेत, आडवे येऊन दाखवा : जितेंद्र आव्हाड

0
147

ठाणे (प्रतिनिधी) : जेजुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे    वेळेच्या आधीच आज (शुक्रवार) भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अनावरण केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीका केली. या टीकेला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पवार साहेब उद्या जेजुरीला येताहेत. हिंमत असेल तर आडवे येऊन दाखवा, असे आव्हान आव्हाड यांनी पडळकरांना दिले आहे.  

शरद पवारांवर टीका केली की हेडलाइन होते, हे महाराष्ट्र गेल्या ४० वर्षांपासून पाहतो आहे. पडळकरांनाही ही कला उमजलीय. पडळकरांनी एखाद्या चोरासारखं पहाटेच्या अंधारात अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण केले. त्यांच्यात हिंमत होती तर दुपारी अनावरण करायचे. सांगून करायचे. उद्या साहेब तिथं येणार आहेत, हिंमत असेल तर अडवून दाखवा. तुम्हाला पुन्हा कदाचित उभंही राहता येणार नाही, असा इशारा आव्हाड यांनी दिला.

तुम्ही जसे बोलता, तसे आम्हालाही बोलता येते. आम्ही मर्यादा ठेवून आहोत, म्हणून आम्ही कमी आहोत, असे समजू नका. एक संस्कारक्षम रयत निर्माण करण्याचे कार्य ज्या माऊलीने केले, तिचे नाव घेऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान करू नका, असा सल्लाही आव्हाड यांनी दिला आहे.