‘पाटील’ हा श्रीनिवास पाटलांसारखा ‘रंगेल’ असावा; पण धनंजय मुंडेंसारखा नसावा

0
629
प्रत्येक महापुरुषामागे एक स्त्री उभी असते, पण ती पत्नीच असते असं नाही - श्रीनिवास पाटील

सांगली (प्रतिनिधी) : सागंलीतील गदिमा कविता महोत्सावाच्या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे प्रकरणावरून टोलेबाजी केली. पाटील हा खासदार श्रीनिवास पाटलांसारखा रंगेल असावा, पण तो धनंजय मुंडेंसारखा नसावा, असा चिमटा त्यांनी काढला.

आटपाडी तालुक्यातील माडगुळे येथे महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद आणि पुण्याच्या गदिमा प्रतिष्ठानच्यावतीने राज्यस्तरीय गदिमा कविता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीसही उपस्थि होते. याप्रसंगी कविता, नृत्य आदी कार्यक्रमांची रेलचेल होती. नृत्याचा कार्यक्रम झाल्यावर मान्यवरांची भाषणे झाली. यावेळी श्रीपाल सबनीस यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांचे कौतुक करतानाच धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.

नृत्याच्या कार्यक्रमाचा धागा पकडत सबनीस यांनी समोर कोणकोण नाचत होत्या. नंतर किती घायाळ झाल्या असतील. मी आमच्या पीडी पाटील सरांबद्दल खात्री देतो. पण, श्रीनिवास पाटी सरांबाबत खात्री देऊ शकत नाही. सबनीसांसारखा रंगेल माणूस मी आयुष्यात कधी पाहिला नाही. पाटील असाच असावा लागतो. परंतु, धनंजय मुंडेंचं जे काही प्रकरण सुरू आहे. तसा पाटील आम्हाला नकोय. तसा पाटील सिनेमा, नाटक आणि साहित्यात रंगवाल गेला आहे.