मुंबई  (प्रतिनिधी) : ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांनी राजीनामा दिल्याने  पराग अग्रवाल यांची नवे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या वर्षापासूनच  डॉर्सी यांनी मी लवकरच कंपनी सोडणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर  त्यांचा उत्तराधिकारी नेमण्याची  प्रक्रिया सुरू  झाली होती.

डॉर्सी यांनी  प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे की, कंपनीत मी सहसंस्थापक म्हणून  कामाला सुरूवात केली. त्यानंतर एक्झिक्युटिव्ह चेअरमन,  सीईओ पदाची जबाबदारी सांभाळली. सीईओ म्हणून १६  वर्षे काम केल्यानंतर आता मी थांबण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यामुळे मी पदाचा राजीनामा दिला आहे.

दरम्यान, पराग अग्रवाल  यांनी ट्विटरचे चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर म्हणजेच मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. अग्रवाल यांनी ट्विटरमध्ये इंजिनिअर म्हणून करिअरची सुरुवात केली होती. आता ते सीईओ पदाची सूत्रे हाती घेणार आहेत.

अग्रवाल यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये डॉक्टरेट पदवी घेतली आहे. त्यांनी आयआयटी बॉम्बेमधून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. तसेच  त्यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएचडीही केली आहे.