पणोरे ग्रामस्थांतर्फे शहिदांना आदरांजली…

0
83

कळे (प्रतिनिधी) : पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झालेले कोल्हापूरचे जवान संग्राम पाटील, ऋषिकेश जांभळे व कुलदीप जाधव तसेच मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस व जवानांना पन्हाळा तालुक्यातील पणोरे येथील धडपड फौंडेशन व ग्रामस्थांच्या वतीने गुरुवारी आदरांजली वाहण्यात आली.

पणोरे येथील मुख्य चौकात कॅन्डल मार्चद्वारे काढून सर्व शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. या वेळी ‘भारतमाता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या.