कळे (प्रतिनिधी) : इचलकरंजी येथे शिवाजी विद्यापीठांतर्गत झोनल क्रीडा स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये पन्हाळा तालुक्यातील पणोरे येथील लहू बाळा परितकर महाविद्यालयाचे विजय पाटील याने फ्री स्टाईल कुस्ती आणि अतुल मगदूम याने ग्रीको प्रकारामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. यांना  पै. विजय पाटील, महाविद्यालयाचे क्रिडाशिक्षक प्रा. आर. डी. पाटील, संस्थेचे चेअरमन एम.एल.परितकर, प्राचार्य एस.ए.माळवी यांचे मार्गदर्शन लाभले.