पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा गड पुन्हा एकदा सर्वांसाठी खुला करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. या वर्षीच्या जोरदार पावसामुळे पन्हाळगडाचा पुन्हा रस्ता खचल्यामुळे तो मार्ग आत्तापर्यंत बंदच आहे. पण  पर्यटकांच्यावर अवलंबून असणारी छोटे-मोठे व्यवसायिकांची बाब लक्षात घेता खचलेल्या मार्गावरून पाई प्रवास करण्यासाठी पर्यटक व सर्वांसाठी खुला करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

बुधवार पेठ येथे  वाहनतळ करून चालत जाण्यासाठीचा मार्ग तयार करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर तीन दरवाजा इथूनही सुद्धा येण्यासाठीचा मार्ग  गडावर आहे. गडाच्या पायथ्याशी वाहन लावून गडावर प्रवेश करता येणार आहे. त्याचबरोबर कोरोना संर्सगच्या सर्व नियमांचे पालन करून गडावरील सर्व व्यवसाय चालू करण्याची आदेश दिला आहे. पण विकेंड लॉकडाऊनमुळे  पन्हाळा शनिवार-रविवार बंदच राहणार असल्याची सांगण्यात आले. यावेळी खचलेल्या रोडच्या साईडला सार्वजनिक बांधकाम विभागाने बॅरिकेट्स लावण्यात आलेले आहेत. चालत जाण्यासाठी चा मार्ग तयार करण्यात आलेला आहे.

यावेळी मुख्याधिकारी स्वरूप खारगे,  माजी नगराध्यक्ष विजय पाटील,रवींद्र धडेल, मारूती माने, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता संजय काटकर, उप अभियंता सी ए आयरेकर, शाखा अभियंता अमोल कोळी यांनी पाहणी केली  सर्वांसाठी चालत जाण्याचा मार्ग तयार करण्यात आला.