पन्हाळा (प्रतिनिधी) : राज्याच्या नगरविकास विभागाकडून खा. धैर्यशील माने यांच्या प्रयत्नामुळे पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेला विशेष अनुदानातंर्गत २० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून पन्हाळा शहरातील अर्धशिवाजी पुतळ्याचे शुशोभिकरण, बाजीप्रभू पुतळा शुशोभिकरणासाठी हे अनुदान मिळाले आहे.

खा. धैर्यशील माने यांनी पन्हाळा नगरपरिषदेला विविध विकासकामांसाठी  निधी मिळावा म्हणून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आराखडा पाठविला होता. त्यानुसार २० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. यामुळे पन्हाळ्यातील अर्धशिवाजी पुतळा तसेच बाजीप्रभू पुतळा यांचे शुशोभिकरण आता लवकरच होणार असल्याचे नगराध्यक्षा रुपाली  धडेल यांनी सांगितले.