पन्हाळा उड्डाणपुलाचे काम लवकर होण्यासाठी प्रयत्न करणार : खा. धैर्यशील माने

0
254

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा उड्डाणपुलाचे काम लवकर होण्यासाठी प्रयत्न करणार असे खा.धैर्यशील माने यांनी सांगितले. पन्हाळा येथील चार दरवाजा  मुख्य रस्ता खचल्याने पन्हाळ्याचा मुख्य मार्ग बंद झाला आहे या रस्त्याची पाहणी त्यांनी केली.

मुख्य मार्ग बंद झाल्याने स्थानिक नागरिकांची गैरसोय लक्षात घेता रेडेघाड मार्गे बुधवारपेठ पर्यंत पर्यायी रस्ता तातडीने सुरु करण्याच्या सुचना देण्यात आल्या असल्याचे खा .धैर्यशील माने यांनी सांगितले यावेळी तहसिलदार रमेश शेंडगे मुख्याधिकारी स्वरुप खारगे माजी आमदार सत्यजीत पाटील , शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, अमरसिंह भोसले, असिफ मोकाशी, रविंद्र धडेल, आशोक चव्हाण, मारुती माने, जुनैद मुजावर, कुलदिप बच्चे, प्रवीण शिंदे, आकतर शेक, आदी उपस्थित होते.