कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पन्हाळा महोत्सव लांबणीवर

0
69

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर पन्हाळा  महोत्सव लांबणीवर टाकण्यात आला आहे.  नगरपालिकेच्या वतीने २६,२७ आणि २८  फेब्रुवारीरोजी महोत्सव आयोजित करण्यात येणार होता. परंतु हा महोत्सव तूर्तास रद्द करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पुणे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली आहे.

या महोत्सवात सांस्कृतिक,  खादय महोत्सव,  ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन,  बचत गट स्टॉल,  लोकसंगीत, पोवाडे,  लावणी कार्यक्रम,  सायकल/मॅरेथॉन स्पर्धा, मर्दानी खेळ कार्यक्रम,  भव्य चित्रकला/वत्कृत्व स्पर्धा,  अंध मुलांचा कार्यक्रम, पन्हाळागड दिवे/मशालींच्या प्रकाशात पाहणे,  छावा: छ. संभाजीराजे यांचेवर नाटक, चला हवा येऊ दया अथवा तत्सम सिनेतारका मनोरंजन कार्यक्रम यांचा समावेश करण्यात आला होता. मुख्य आकर्षणामध्ये कोल्हापूरी मिसळ व तांबडा- पांढरा रस्सा यांचा आस्वाद असा हा महोत्सव होता. तथापि,  वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पन्हाळा महोत्सव पुढे ढकलण्यात आला आहे.