Published October 16, 2020

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठ कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता माहिती, मार्गदर्शन केंद्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन जॉबफेअर १९ ते २० ऑक्टोबरला होत आहे. अशी माहिती विद्यापीठ कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त सं. कृ. माळी यांनी दिली.

माळी म्हणाले की, या मेळाव्यात विविध शैक्षणिक पात्रतेची जिल्ह्यातील नामांकित आस्थापनांची विविध रिक्तपदांव्दारे संधी उपलब्ध केली आहे. हा मेळावा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी आपल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे विभागाच्या www.rojgar. mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर लॉगीन करून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उचित असलेल्या रिक्तपदांसाठी आपला पसंतीक्रमांक ऑनलाईन पध्दतीने नोंदवावी.

ऑनलाईन पसंतीक्रम नोंदवणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पसंती क्रमानुसार व उद्योजकांच्या सोईनुसार मुलाखतीचे ठिकाण, दिनांक आणि वेळ एसएमएस अलर्टव्दारे कळवण्यात येईल. शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येईल. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या ०२३१- २६९०६४५ वर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023