कोल्हापूर (प्रतिनिधी) :  संततधार सुरु असलेल्या पावसामुळे आज (गुरुवार) रात्री नऊच्या दरम्यान राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी ४१ फूट ८ इंच इतकी झाली आहे. पंचगंगेची इशारा पातळी ३९ फूट आहे. तर धोकापातळी ४३ फूट इतकी आहे. तर एकुण पाण्याखाली गेलेले बंधारे १११ इतके आहेत. रात्री नऊच्या दरम्यान पाणीपातळी ४२ फूटाच्या आसपास पोहचल्याने कोणत्याही क्षणी पंचगंगा नदी धोकापातळी ओलांडण्याची शक्यता आहे. यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये कोणत्याही क्षणी पुराचे पाणी घुसू शकते. त्यामुळे प्रशासनाने या गावांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.