पाकिस्तानची आर्थिकस्थिती बिकट : इम्रान खान यांनी विकले आपले घड्याळ

0
25

इस्लामाबाद (वृत्तसंस्था) :  पाकिस्तानची आर्थिक स्थिती एकदम बिकट झाली आहे. त्यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांना परदेशातून मिळालेल्या महागड्या भेटवस्तू विकून आपली झोली भरण्यात व्यस्त झाले आहेत. असा आरोप पाकिस्तानमधील प्रमुख विरोधी पक्षांनी केला आहे. इम्रान खान यांनी इतर देशांकडून मिळालेल्या भेटवस्तू बेकायदेशीरपणे विकल्या आहेत. यात त्यांनी १० लाख किंमतीच्या महागड्या घड्याळाचा समावेश आहे. या आरोपावर इम्रान यांनी मौन बाळगले आहे.

राज्य प्रमुख आणि घटनात्मक पदांवर असलेले अधिकारी यांच्यात अधिकृत भेटींमध्ये भेटवस्तूंची देवाणघेवाण केली जाते. पाकिस्तानमधील गिफ्ट डिपॉझिटरी (तोशाखाना) नियमानुसार, या भेटवस्तू राष्ट्राची मालमत्ता आसतात, जोपर्यंत त्यांचा उघड लिलाव होत नाही. तथापि, नियम असेही सांगतात की अधिकारी एक लाखांपेक्षा कमी भेटवस्तू आपल्याकडे ठेवू शकतात. पंतप्रधान इम्रान खान यांनी या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप विरोधी नेत्यांनी केला आहे.