पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजमवर लैंगिक शोषणाचा आरोप…

0
52

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजम याच्यावर एका महिलेनं पत्रकार परिषद घेत लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. या महिलेनं स्वत:ला बाबर आजमची शाळेतील मैत्रीण असल्याचे सांगितलं. तसेच आजमला वेळोवेळी आर्थिक मदत केल्याचा दावाही या महिलेने केला आहे.

महिलेने सांगितले की, बाबर आजमला मी शाळेत असल्यापासून ओळखतेय. आम्ही एकाच ठिकाणी राहत असल्यामुळे आमच्यात चांगली मैत्रीही झाली होती. २०१० मध्ये बाबर आजमने लग्नासाठी मला प्रपोज केलं होतं. याला माझाही होकार होता परंतु, आमच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता. त्यामुळे २०११ मध्ये बाबरने पळवून नेऊन त्याने मला वेगवेगळ्या ठिकणी लैंगिक अत्याचार केले. काही दिवसानंतर त्यानं लग्न करण्याचा आपला निर्णय बदलला. आणि मला पोलिसांत गेल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे त्या महिलेने सांगितले.