…तर धामणी प्रकल्प तेव्हाच पूर्ण केला असता : पी. एन. पाटील

0 864

कळे (प्रतिनिधी) : गेल्या पाच वर्षापूर्वीच निवडून दिले असते तर धामणी मध्यम प्रकल्प केव्हाच पूर्ण केला असता. त्याचबरोबर धामणी खोऱ्यातील अनेक प्रश्न मार्गी लावले असते, असे प्रतिपादन करवीर मतदारसंघातील काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पी. एन. पाटील यांनी वेतवडे (ता. पन्हाळा) येथील सभेत केले. मल्हारपेठ, सावर्डे ते बळपवाडी व निवाचीवाडी ते सुळे आदी १९ गावामध्ये त्यांचा प्रचार दौरा पार पडला. 

पाटील म्हणाले की, विरोधक सगळीकडे फक्त थापा मारण्याचे काम करत असुन मंजूर न झालेली कोट्यावधीच्या कामांची फक्त पोस्टरबाजी करत असून १०० ते २०० लोकसंख्या असणाऱ्या ठिकाणीही कोट्यवधी रुपये दिले असल्याचे बोर्ड लावत आहेत. त्यामुळे सगळीकडे फक्त पोस्टरबाजी असून त्यांचा एकत्रित खर्च काढला तर त्याचीच रक्कम महाराष्ट्र सरकारच्या बजेट पेक्षा ती जास्त होईल अशी टीका करीत मला बोर्ड लावायची सवय नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

भाजप सरकार खोटारडे असून माझ्या काळात मी शेतकऱ्यांना १२ वरून ७ टक्के व्याजाने कर्ज देण्यास भाग पाडले. आता या सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. वेतवडेतील दिनकर देवजी पाटील यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका करत कॉंग्रेस शिवाय पर्याय नसल्याचे  सांगितले.

त्यावेळी जयसिंग पाटील, विनोद पाटील, अनिल पाटील, विलास पाटील, बाळासाहेब मोळे, बाजीराव पाटील, केरबा पाटील, पांडु पाटील,शिवाजी पाटील, प्रकाश पाटील, युवराज पाटील यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More