…अन्यथा तीव्र आंदोलन करू : सरपंच काशिनाथ कांबळेंचा इशारा

0
131

टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगांव ते हेरले मार्गावरील मौजे वडगांव ते बारगीर मळा दरम्यानचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. तरी या रस्त्याचे डांबरीकरण तत्काळ न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सरपंच काशिनाथ कांबळे आणि तंटामुक्त अध्यक्ष महेश कांबरे यांनी आज (सोमवार) दिला आहे.

हेरले ते मौजेवडगांव दरम्यान २ किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब झाला होता. याबाबत हेरले भाजप शाखेच्या वतीने तत्कालिन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत  पाटील यांना निवेदन दिले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने या रस्त्यासाठी ५० लाखांचा निधी मंजूर केला होता.

सध्या या रस्त्याचे काम सुरु झाले असून केवळ दीड किलोमीटर रस्ता केला जात  आहे. उर्वरीत अर्धा किलोमीटर रस्ता तसाच राहणार आहे. हा अर्धा किलोमीटर रस्ता अत्यंत खराब झाला आहे. मोठमोठे खड्डे पडले असून अपघात होण्याची शक्यता आहे. तरी अर्ध्या किलोमीटर रस्त्यासाठी संबंधित विभागाने तत्काळ निधी द्यावा, अन्यथा ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सरपंच काशिनाथ कांबळे आणि तंटामुक्त अध्यक्ष महेश कांबरे यांनी दिला आहे. यावेळी पोलीस पाटील अमीर हजारी, विनायक चौगुले, महादेव आवटे, गुरुनाथ डोळे, शकील मुल्लाणी आदी उपस्थित होते.