कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिले माफ करण्यात यावीत. अन्यथा रस्त्यावर उतरून सरकारशी दोन हात करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खा.राजू शेट्टी यांनी दिला आहे. लॉकडाऊन काळात सर्वसामान्य माणसाचे काम बंद होते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वीज बील भरणार नाही. आणि सरकारने वीज बील सक्तीने वसूल केल्यास तीव्र पडसाद उमटतील, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे.

ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी घरगुती वीज बिले वसूल केले जाईल, असे वक्तव्य केले आहे. यावर राजू शेट्टी म्हणाले की, वीज बिले वसूल करणार, ही काय गोड बातमी आहे काय? नितीन राऊत यांना जर कोणतेही अधिकार नसतील, तर पोकळ घोषणा करू नयेत, आधी त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारून मगच घोषणा करावी, असा सल्ला राजू शेट्टी यांनी दिला.